एक्स्प्लोर
लाईव्ह टीव्हीव्हिडीओशॉर्ट व्हिडीओवेब स्टोरिज्फोटो गॅलरीपॉडकास्टमुव्ही रिव्ह्यू
यूजफुल
होम लोन EMI कॅलक्यूलेटर बीएमआय कॅलक्यूलेटर वय मोजा/ वय कॅलक्यूलेटर एज्युकेशन लोन EMI कॅलक्यूलेटर कार लोन EMI कॅलक्यूलेटर पर्सनल लोन EMI कॅलक्यूलेटर पेट्रोलचे दर डिझेलचे दर
मुख्यपृष्ठकरमणूकनीता अंबानींचा वयाच्या साठीतही स्लीम ट्रीम फिटनेस, पर्सनल ट्रेनर विनोद चन्नाची एक तासाच्या फीचा आकडा ऐकाल तर...
भारतातील प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांच्या पत्नी नीता अंबानी (Nita Ambani) नेहमीच आपल्या लूक्स, फॅशन सेन्ससोबतच आपल्या फिटनेससाठी चर्चेत असतात.
By : नामदेव जगताप|Updated at : 12 May 2025 08:47 AM (IST)
Who Is Nita Ambani Personal Trainer?
Source :
ABP MajhaWho Is Nita Ambani Personal Trainer? आजच्या सोशल मीडियाच्या (Social Media) युगात फिट अन् फाईन राहणं हा ट्रेंड झाला आहे. फिटनेस हा पर्सनल नाहीतर, सोशल मुद्दा बनला आहे, विशेषतः सेलिब्रिटींसाठी (Celebrity Fitness). रेड कार्पेट इव्हेंटपासून ते एअरपोर्ट लूकपर्यंत, सगळेच कॅमेरे सेलिब्रिटींची एक झलक पाहण्यासाठी सज्ज असतात. अशा परिस्थितीत, त्यांचा फिजिकल फिटनेस केवळ फॅशन स्टेटमेंट नसून एक प्रोफेशनल गरज बनला आहे. अशातच आपण अभिनेत्रींच्या फिटनेसच्या चर्चा नेहमीच ऐकतो. असं एक व्यक्तिमत्त्व आहे, जे आपल्या फिटनेसनं सर्वांनाच अचंबित करतं. तर, फिटनेसबाबत त्या भल्याभल्या बॉलिवूड अभिनेत्रींनाही मागे टाकतात. ते व्यक्तिमत्व म्हणजे, नीता अंबानी.
भारतातील प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांच्या पत्नी नीता अंबानी (Nita Ambani) नेहमीच आपल्या लूक्स, फॅशन सेन्ससोबतच आपल्या फिटनेससाठी चर्चेत असतात. त्यांच्या फिटनेसचं संपूर्ण श्रेय त्यांचा पर्सनल फिटनेस ट्रेनर विनोद चन्ना यांना जातं. नीता अंबानींचे सध्याचे फिटनेस ट्रेनर विनोद चन्ना यांनी अंबानी स्वतःला कसं तंदुरुस्त ठेवतात? हे सांगितलंय आणि त्यासोबतच त्यांनी त्यांच्या फीबद्दलही चर्चा केली.
फिटनेसच्या या जगात, एक नाव जे पुन्हा पुन्हा चर्चेत येतं, ते म्हणजे सेलिब्रिटी फिटनेस ट्रेनर विनोद चन्ना. त्यांनी केवळ बॉलिवूड स्टार्सच नव्हे तर भारतातील प्रसिद्ध उद्योगपतींचं शरीर आणि जीवन बदलण्याचं काम केलं. त्यांचा आतापर्यंतच्या यशापैकी सर्वात यशस्वी प्रवास ठरला तो, अनंत अंबानींचा 100+ किलो वजन कमी करण्याचा. सगळीकडे विनोद चन्ना यांच्या नावाची चर्चा रंगली होती. फक्त अनंत अंबानीच नाहीतर विनोद चन्ना यांनी नीत अंबानींनाही 18 किलो वजन कमी करायला मदत केली.
नीता अंबानींसाठी विनोद चन्ना यांनी एक जबरदस्त फिटनेस प्लान डिझाइन केलाय. त्यामुळे वयाची साठी ओलांडलेल्या नीता अंबानी आजही चाळीशीच्या बॉलिवूड अभिनेत्रींना मागे टाकतात. नीता अंबानींच्या फिटनेस ट्रेनरच्या फीबाबत बोलायचं झालं तर, सुरुवातीला विनोद चन्ना फारच कमी फी घ्यायचे. त्यानंतर त्यांनी जेव्हा सेलिब्रिटी क्लायंट घ्यायला सुरुवात केली, त्यावेळी त्यांनी फी वाढवली.
नीता अंबानींचा फिटनेस ट्रेनर विनोद चन्ना 12 सेशन्ससाठी 1.5 लाखांपर्यंत शुल्क आकारतात. तसेच, कुणाच्या घरी जाऊन ट्रेनिंग दिली, तर त्यासाठी तो 2 ते 2.5 लाखांपर्यंत फी घेतात, अशी माहिती स्वतः विनोद चन्ना यांनी दिली आहे. तसेच, जर कुणी संपूर्ण दिवसासाठी बोलावलं, तर विनोद चन्ना एका दिवसाचे लाखो रुपये घेतो. तसेच, लोक फक्त आणि फक्त वाढलेलं वजन कमी करण्यासाठी माझ्या जिमजवळ थांबतात, असंही त्यानं सांगितलं.
शिल्पा शेट्टी, जॉन अब्राहमसाठीही केलंय काम
विनोद चन्नानं शिल्पा शेट्टी, जॉन अब्राहमसारख्या प्रसिद्ध सेलिब्रिटींसाठीही काम केलं आहे. त्यासोबतच अंबानींचे चिरंजीव अनंत अंबानींचं वजन कमी करण्याचं श्रेयही विनोद चन्ना यांनाच जातं. 2016 मध्ये विनोद चन्ना यांनी 18 महिन्यांमध्ये अनंत अंबानींचं 108 किलो वजन कमी करायला मदत केली होती.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
रात्री घरी उशीरा आल्यावर मला वेश्या म्हणायचे, वडील कसे त्रास द्यायचे? अभिनेत्रीनं सांगितला हादरवणारा किस्सा
Published at : 12 May 2025 08:47 AM (IST)
Tags :
Anant Ambani Nita Ambani HEALTH TIPS Healthy Diet
अधिक पाहा..
Sponsored Links by Taboola
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
#Indian-Pakistan Ceasefire# Operation Sindoor update# india attack pakistan
Advertisement
व्हिडीओ
फोटो गॅलरी
ट्रेडिंग पर्याय
अभय पाटील
SRH vs LSG IPL 2025: अभिषेकची बॅट स्विंग, हैदराबाद किंग
Opinion